top of page

Happy Mother's Day

  • Oct 26, 2019
  • 1 min read

Updated: May 22, 2020

न लिहलेल पत्र ,

आई ,       एक सांगू का ? खूपदा  मनातल सांगायच असत गं, पण  वाटते तू उगाच चिंता करशील ...... एकट वाटते गं कधी कधी...मन शांतच होत नाही. फोन हातात घेउन परत ठेउन देते मी. कारण मला वाटते तू उगाच चिंता करशील .....       कधी येणार घरी नेहमी विचारतेस....अस वाटते सांगुन दयाव की मला आधी पास होऊ दे कारण एखादया विषयाची भीती असते कधी कधी ..नंतर येईलच घरी.पण  वाटते तू उगाच चिंता करशील म्हणुन काहिही कारणं सांगते मी ...    आई, खर  सांगु  का कधी कधी खूप  भीती वाटते मला ... मैत्रीणी आजूबाजुला असतानाही एकांतवास का मनात घर करतो माहित नाही गं ....फोन करून भाड भाड रडाव वाटते गं .....पण  वाटते तू उगाच चिंता करशील .....

ree

     खूपदा मेसच जेवण नकोस वाटत...पण उपाय नसतो गं ...          तू खूप मेहनती ने मोठ केलस मला ...तुझे विचार मनात पेरले . तेच विचार व्यक्त केले की  लोक  Feminist म्हणतात मला ...मला एक सांग दादाने विचार मांडले तर तो पुरूष आणी मी व्यक्त केले तर मी स्त्रीवादी अस का गं ?? आई मान्य आहे आपल्यात Generation Gap  आहे ...पण खूप शिकवायच आहे मला तुला  ...मी  विचारलेल्या शंकाना उत्तर पाहीजेत मला ... कारण नाही समजत मला दुनिया अजुन ..    प्रेम तर दिलससं ..त्यात काही शंकाच नाही.प्रेमाचा उल्लेख शेवटीच करते ..कारण वरिल गोष्टींचा मोठा वाटा आहे प्रेमापेक्षा ...तुझी चिंता मला अशक्त नाही तर कणखर बनवते ... उपकार, आभार काही व्यक्त नाही करत आता ...बराच  लांबचा पल्ला गाठायाचा आहे आपल्याला ...आनंदी राहा फक्त तू



-मोनिका



 
 
 

Comments


bottom of page